Bal Din

Zhep Bahuuddeshiya Samajik Vikas Sanstha

झेप बहुउद्देशीय सामजिक विकास संस्थेतर्फे बालदिन उत्साहात साजरा. आज 14 नोव्हेंबर 2018 बालदिनानिमत्त्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काळनमुस्ते या आदिवासी गावामध्ये झेप बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गावामधील मुलांसोबत बालदिन साजरा करण्यात आला. सर्व बालकांना बालदिनाच्या शुभेच्छा संस्थेच्या अध्यक्षा सुनिता निमसे यांनी दिल्या. तसेच पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या आनंद मेळाव्यात बालकांसोबत संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्यां भारती बागुल यांनी संवाद साधला. तसेच बालकांचे हक्क व अधिकार याविषयी पालकांमध्ये व समाजामध्ये जनजागृती यावी व त्याच्या आरोग्य व शिक्षणाबदल जागृक असावे असे संस्थेच्या अध्यक्षा सुनिता निमसे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्तविकात सांगितले. तसेच कार्यक्रमामध्ये लहान मुलांनी गीत अभिनय तसेच विविध कलागुण सादर केले. तसेच मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गावाच्या सरपंच सौ. हर्षदा चंदन बुरंगे, मा. वनाधिकारी रत्ना तूपलोंढे ,ग्रामसेवक श्री. किसन हरी राठोड, (माजी)सरपंच श्री. नामदेव बुरंगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित कपाटे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. तसेच संस्थेचे कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले .पूनम शेळके, सुनिल भुसावळ,कुमार निमसे, राहुल सोनवणे आदि उपस्थित होते